Quantcast
Channel: Marathi Movie Free Download, Posters, Story, Date, Stills, Platform, Lyrics and Many More
Viewing all articles
Browse latest Browse all 344

वसंत पंचमी

$
0
0

वसंत पंचमी

हा दिवस देवी सरस्वतीचा जन्मदिवस म्हणूनही साजरा केला जातो .पौराणिक कथेनुसार वसंत पंचमी आणि सरस्वती पूजन करण्यामागे अत्यंत रोचक कथा आहे. कथा या प्रकारे आहे-अशी मान्यता आहे की सृष्टी रचयिता ब्रह्माने जेव्हा जीव आणि मनुष्यांची रचना केली होती तेव्हा ब्रह्माने आपल्या संसाराकडे बघितले तेव्हा त्यांना सगळीकडे निर्जन असल्याचे जाणवत होते. वातावरण अगदी शांत होतं ज्यात कुठलीही वाणी नव्हती. हे बघून ब्रह्मा उदास आणि असंतुष्ट होते. तेव्हा ब्रह्मांनी प्रभू विष्णूंच्या आज्ञेने आपल्या कमंडळातून पाणी घेऊन पृथ्वीवर शिंपडले. धरतीवर पडलेल्या त्या पाण्यामुळे पृथ्वीवर कंपन झाले आणि एक अद्भुत शक्तीच्या रूपात चतुर्भुजी अर्थात चार भुजा असलेली एक सुंदर स्त्री प्रकट झाली. त्या देवीच्या एका हातात वीणा, दुसर्‍या हात वर मुद्रेत आणि इतर दोन हातात पुस्तक आणि माळ होती. ब्रह्माने त्या स्त्रीला वीणा वाजवण्याचा आग्रह केला तेव्हा वीणाच्या सुरांमुळे पृथ्वीवरील सर्व जीव- जंतूंना वाणी प्राप्त झाली. त्या क्षणानंतर देवीला सरस्वती असे म्हटले गेले. त्या देवीने वाणीसह विद्या आणि बुद्धी दिली. वसंत पंचमी देवी सरस्वतीच्या जन्मोत्सवच्या रूपात देखील साजरी केली जाते. या देवीला बागीश्वरी, भगवती, शारदा, वीणावादनी और वाग्देवी यासह अनेक नावे आहेत. संगीताची उत्पत्ती केल्यामुळे तिला संगीताची देवी म्हणून देखील पुजलं जातं.यामागील एक पौराणिक कथा ही देखील आहे की सर्वप्रथम श्री कृष्ण आणि ब्रह्माने याच दिवशी देवी सरस्वतीची पूजा केली होती. देवी सरस्वतीने जेव्हा कृष्णाला बघितले तेव्हा देवी त्यांचा रूप बघून मोहित झाली आणि कृष्णाला पती रूपात प्राप्त करू इच्छित होती. ही गोष्ट कृष्णाला कळल्यावर त्याने स्वत:ला राधा प्रती समर्पित असल्याचे सांगितले परंतू सरस्वतीला प्रसन्न करण्यासाठी कृष्णाने देवीला वरदान दिले की विद्या इच्छुक माघ महिन्यातील पंचमीला आपले पूजन करतील. हे वरदान दिल्यानंतर सर्वप्रथम कृष्णाने देवीची पूजा केली. तेव्हापासून वसंतपंचमीला सरस्वती पूजनाची परंपरा सुरू झाली.

सरस्वतीदेवीचे पूजन करण्याच्या पद्धती
वसंतपंचमीचा हा दिवस सरस्वतीदेवीच्या साधनेसाठीच अर्पण केला जातो. शास्त्रांमध्ये भगवती सरस्वतीची आराधना वैयक्तिक स्वरूपात करण्याचे विधान आहे; पण सध्या सार्वजनिक पूजामंडपांत देवी सरस्वतीची मूर्ती स्थापन करून तिची पूजा करण्याचा प्रघात चालू झाला आहे. हा ज्ञानाचा सण असल्यामुळे विद्यार्थी शिक्षण संस्थेची सजावट करतात. विद्यारंभ संस्कारासाठी हा सर्वोत्कृष्ट मुहूर्त आणि दिवस असतो.वसंतपंचमी हा सर्व प्रकारच्या शुभकार्यांसाठी अत्यंत शुभमुहूर्त मानला गेला आहे. यांत प्रामुख्यानेे नवी विद्याप्राप्ती आणि गृहप्रवेश यांसाठी वसंतपंचमीला पुराणांतही अतिशय श्रेयस्कर मानले गेले आहे. वसंतपंचमीला शुभमुहूर्त मानण्यामागे अनेक कारणे आहेत. हे पर्व बहुतेक वेळा माघ मासातच येते. माघ मासाचे धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टीनेही विशेष महत्त्व आहे. या मासात ‘पवित्र तीर्थक्षेत्री स्नान करणे’, हे विशेष महत्त्वाचे मानले गेले आहे.

या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता।
या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना॥
या ब्रह्माच्युत शंकरप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता।
सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा॥१॥

शुक्लां ब्रह्मविचार सार परमामाद्यां जगद्व्यापिनीं।
वीणा-पुस्तक-धारिणीमभयदां जाड्यान्धकारापहाम्‌॥
हस्ते स्फटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थिताम्‌।
वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदाम्‌॥२॥

The post वसंत पंचमी appeared first on Marathi Unlimited.


Viewing all articles
Browse latest Browse all 344

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>