Quantcast
Channel: Marathi Movie Free Download, Posters, Story, Date, Stills, Platform, Lyrics and Many More
Viewing all articles
Browse latest Browse all 344

कोरोना फक्त वाईट च का

$
0
0

कोरोना मुळे किती तरी परिवार उध्वस्त झाले आणि काही काही परिवार च नाही तर जगातील ८०% देश त्रस्त झालेत त्यामुळे तो वाईट आहे हे काळ्या दगडावरची पांढरी रेश आहेच पण काहीही कितीही बोलल तरी कोरोना ने किती तरी चांगल्या गोष्टी घडवलेल्या आहेत त्या नाकारता येणार नाहीत.
भारता सारख्या देशात
१) सुरुवात झाली घरात बसण्या पासून गोष्ट म्हणायला गेल तर तशी छोटीच आहे पण घरात न बसता उगाच कुठे तरी बोंबलत फिरायच आपल्या मुळे दुसऱ्यांना त्रास देत वायफळ खर्च करत फिरायच ते बंद झालं आता लॉक डाऊन सुरुवाती पेक्षा बऱ्या पैकी सौम्य झालाय पण बरेच लोक फक्त महत्त्वाच्या कामाला बाहेर पडतायेत पुण्या (लोक ज्याला सिटी म्हणतात) सारख्या ठिकाणी तर बाजारपेठा उघड्या झाल्या असून लोकांची गर्दी नाही.
२) कारोना आला लोकांचं स्वतः च्याच घरात पुरेपूर नसलेला वावर एकमेकांना वेळ न दिल्या मुळे होणाऱ्या उणीवा बऱ्या पैकी कमी झाल्या.प्रत्येकजण आपल्या आपल्या परिवाराला वेळ देवू लागला.आजच्या शहरी वातावरणात दगदगीच्या जीवनात मुलांना आई बापांची मनमोकळीक पने भरपूर साथ मिळाली.
३) म्हातारे आई वडील काही गोड मुलांना नको नको झालेले असतात.या वाईट काळात त्यांची सांगत लाभल्याने त्यांची या आयुष्यात असलेली किंमत कळाली.
४) सगळेच नाही म्हणणार पण किती तरी असे लोक असतात ज्यांना पैशांची किंमत नसते त्यांना आणि सर्वांनाच पैशाची किंमत कळाली.
५) एक बाप आपल्या मुलीच्या लग्नासाठी मुलीचा जन्म झाल्या पासून १–१ रुपया जमा करत असतो तरी आजच्या महागाईच्या काळात तो पुरत नाही. शेकड्याने लोक काही वायफळ खरच नको नको तो पैशाचा दिखावा अश्या अनेक गोष्टी. आज या कोरोनाच्या वेळी लग्न करायचे असल्यास फक्त पन्नास जणांच्या उपस्थितीत लग्न सोहळे अतिशय आनंदात पार पडत आहेत आणि मुलीच्या लग्नात कर्जबाजारी होणाऱ्या बापंची संख्या थोडी थोडकी का होईना पण कमी झाली आहे.
६) मंदिरांला टाळी लागली त्यामुळे ब्राह्मण भट्टांची अनेक काम बंद पडली.माणूस मेला तरी लोक त्याझ्या आत्म्याच्या शांती साठी हजारोंनी खर्च करायचे तो मेला की त्याझ्या सरणावर जण्या पासून त्याझ्या वर्षश्राद्ध पर्यंत जेवण भोग पूजा देव दर्शन आणि बरच काही ते बंद झालं आणि मेलेल्यांच्या आत्मा त्या गोष्टी नसल्या तरी आनंदाने स्वर्गात जात आहेत.
७) आणि या मुळेच माणसाला आयुष्याची, आयुष्यात असलेल्या माणसांची , पैशाची , वेळेची , किंमत चांगलीच कळली.
८) अनेक सामाजिक सुधारणा घडल्या किंवा त्या घडायला सुरुवात तरी झाली अस नक्कीच म्हणता येईल.
९) नकारात्मकत दृष्टिकोनामुळे देखील समाजात चाललेल्या अनेक विकृत पद्धती समोर आल्या त्या सुधारणे साठी अनेक लोकांनी स्वतः पासून सुरुवात केली.शेवटी सांगायचं फक्त एवढच की प्रत्येक गोष्ट नकारात्मक दृष्टिकोनातून न पाहता त्याच गोष्टी थोड्या थोडक्या का होईना सकारात्मक दृष्टिकोनातून पाहून बघा.तुमच्या मता मधे नक्की फरक पडेल.

कोरोना कैदी
बाहेर कर्फ्यु सदृश वातावरण, रस्त्यावर उगाच भटकणाऱ्यांना वर्दीवाले मनापासून चोपतात अशा बातम्या आणि त्यात त्यांचा दोष नाही हे पटत होतं, आणखी म्हणजे आम्ही त्या शहरातील जावई आहोत याचा पास वा परवाना आमच्याकडे नसल्याने आणि त्यांना हे कळायची सुतराम शक्यता नसल्याने आम्ही मात्र नजरकैदेत अन् त्या नाइलाजामुळे संध्याकाळी अंगणात खुर्ची टाकून बसलो, सहज वर नजर गेली, तर निलगिरीच्या पानांआड शेजारच्या इमारतीच्या टेरेसवर काहीतरी हालचाल दिसली, पाहतो तर चारपाच जणांच एक वानर कुटुंब मस्त मजेत उड्या मारीत सैरसपाटा करीत होतं, ते पाहून मनात उगाच त्यांच्या बद्दल आसूया वाटू लागली, एकीकडे सरकारी आदेशानुसार चालती बोलती माणसं आपआपल्या घरात व आहे त्या जागेवरच पुतळा झालेली आणि एक हे मुक्त जीव, आपला नैसर्गिक हक्क बजावत जणू जाणीव करून देत होते कि, निसर्गाचा मान राखा, तो तुमची काळजी घेईल, पण माणूस असा विचार थोडा न करतो, तो तर स्वार्थासाठी जगतो.पर्यटन स्वखर्चाने असो वा फुकट, चार सहा दिवसांपेक्षा जास्त नको वाटतं आणि पाहुणचार कुणाकडून अगदी सासुरवाडीतला का असेना, आठ दिवसांपेक्षा जास्त बरा नसतो, सद्या अशीच काहीशी अवस्था माझी झाली आहे म्हणूनच म्हणावंसं वाटतं की काय पण वेळ येते एक एकदा!

गेल्या महिन्यात सासुबाईनां देवाज्ञा झाल्यामुळे सासुरवाडीला यावं लागलं, जवळपास नाही हो, चांगलंच बाराशे किलोमीटर लांब, परमुलखात ग्वाल्हेरला काही दिवसांच्या मुक्कामा नंतर आस्मादिक सहकुटुंब पुन्हा आपल्या घरी ‘माहेरी’ सुखरूप परत आलेले.पण वेळ सांगून येत नाही म्हणतात तेच खरं, आणखी काही कामानिमित्त आठवड्यापुर्वी पुन्हा सासुरवाडीला यावं लागलं आणि तेही नेमकं कोरोनाच्या सावटाखाली, आणि तिथेच सारा घोटाळा झाला.

तसं पाहिलं तर काही अपवाद वगळता सासुरवाडीला येणं नुकसानदायक नाही हे समस्त जावई मंडळींना वेगळं सांगायला नको, पण परीस्थिती तुमच्यावर कशी वेळ आणेल हे सांगता येत नाही, अगदी असंच काहीसं झालं, परतीच्या हिशोबाने तिकीट वगैरे बुक करून झाले होते, पण करोना आडवा आला, शासकीय आदेशानुसार सुरवातीला मार्च अखेर लॉकडाऊनचा आदेश, सर्व वाहतूक बंद, याला काही पर्याय नाही इतपत ठिक म्हणून “मरता ना क्या करता”? असा विचार करीत मनाला समजावलं.रात्री आठ वाजता प्रधान सेवकांनी देशाला केलेले संबोधन ऐकलं आणि पहिल्यांदा पुढील एकवीस दिवसांच्या कंपलसरी मुक्कामाची आम्ही धास्ती घेतली, तसा कुठल्याही प्रकारचा ताण नसला तरी, शेवटी कुणीही स्वतःला आपल्या नेहमीच्या वर्तुळातच सुरक्षित मानतो, त्याला मी पण अपवाद नाही, एकीकडे मुलांची काळजी आणि लोकांच्या दृष्टीने महत्वाची नसली तरी आपआपली वैयक्तिक (खास)गी कामं असतातच ना?

आता कोणता गनिमीकावा करावा आणि एकवीस दिवसाच्या “कोरोना कैदेतून” कशी सुटका करून घ्यावी? असा प्रश्न डोक्यात फिरतोय, परंतु काही मार्ग निघेलसा दिसत नाही. सारखं ते वानर कुटुंब नजरे समोर येतयं, आणि मान्य कराव लागतय कि “माणूस माकडांचा वंशज आहे” आणि स्वत:च्या चुकीचे आपलंच नुकसान करून घेतोय.

The post कोरोना फक्त वाईट च का appeared first on Marathi Unlimited.


Viewing all articles
Browse latest Browse all 344

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>