Quantcast
Channel: Marathi Movie Free Download, Posters, Story, Date, Stills, Platform, Lyrics and Many More
Viewing all articles
Browse latest Browse all 344

संयमाचे धनी कसे व्हाल !(भाग २)

$
0
0

How to become a master guarded –

This article defines us How to become a master guarded by following some rules like Thinking the introvert in our own heart, Mind Control, being  patient heart and to have self control.

How to become a master guarded

 

स्वतःच्या मनाशी अंतर्मुख होऊन विचार करणे, मन ताब्यात ठेवणे, मनावर संयम असणे यालाच आत्मसंयम म्हणतात. अहंकाराने संयमाच्या गोष्टी साधत नाही.

आपण मंदिरात देव दर्शनास जातो तेथे प्रथमत: कासवाची मूर्ती असते. या कासवाच्या मूर्तीला प्रथम नमस्कार करूनच मंदिरात आतं जावे असाच नियम असतो. परंतु आपण बऱ्याच वेळा त्याकडे दुर्लक्ष करतो. त्यामागचे शास्त्र म्हणजे हि कासवाची मूर्ती म्हणजेच संयमाची मूर्ती होय. कासव हा आवश्यकते नुसारच अवयवांचा वापर करतो, क्षणात आपले सर्व अवयव आंत-बाहेर घेतो. तसेच ते शांतीचे प्रतीक आहे.  त्याची अवयव त्याच्या नियंत्रणात आहेत. त्याच प्रमाणे मनुष्याने सुद्धा स्वतःच्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवले पाहिजे. आपल्या इंद्रियांचे स्वामी झाले पाहिजे. स्वतःचे ध्येय काय आहे, ते साध्य करण्याकरिताच आपली इंद्रिये त्या कार्याला सिद्ध झाली पाहिजेत. ज्याला आपला कर्मयोग साधायचा आहे त्याने संयमयोग अंगी बाळगणे आवश्यक आहे. काही लोक संयमाला बंधने समजतात. परंतु स्वतः स्वतःवर घातलेली हि बंधने नाहीत. आपण आपल्याच अविकासाचे स्वतंत्र  असाल तर त्या स्वतंत्रतेला गुलामीच  मानावी लागेल. आपण स्वतः स्वतःचे गुलाम आहोत असेच समजावे लागेल. संयमाशिवाय विकास असफल आहे. आपल्यात संयम असेल तर मतभेद, भांडणे, तंटा, द्वेष, मत्सर, सूड या कटू भावना आपल्या मनात कधीच जागा करीत नाही. आपली विचारसरणी उच्च असते.  कुटुंबात, समाजात आपण मानाने वावरू शकतो. आपण सर्वत्र जोडली जातो. यशस्वी झालेला मनुष्य सर्वांना हवाहवासा वाटतो. त्याचेच जीवन सुलभ आणि सरस होते. तो सर्वांमध्ये आंनदाने वावरतो.

अध्यात्मिक भावार्थ

सुख आणि शांती प्राप्त करण्याची इच्छा असलेल्या मनुष्याने आपल्या समानच अन्य सुखाची अपेक्षा करणाऱ्याला दंड करू नये तसेच शोषण करू नये, त्याच्या सोबत समान आदर देऊन प्रेमपूर्वक व्यवहार केला पाहिजे. आपण अनेकांना सुखात सामील करून घेतले तर प्रेम द्विगुणित होते. प्रेम दिल्याने प्रेम वाढते. त्याच प्रमाणे क्रोधाने क्रोध वाढते, ईर्च्छेने ईरछा वाढतच जाते. हा प्रकृतीचा नियम आहे. प्रेमाचा अभिप्राय हा नाही कि आपण आपले मत अन्य व्यक्तीवर थोपवू अथवा आपल्या इच्छे नुरुप त्या व्यक्तीला वागण्यास बाध्य करू. आपण त्या दुसऱ्या व्यक्तीच्या नजरेने पाहू, त्याच्या मनाचे अनुभव घेऊ त्याचे विचार समजून घेऊ, आणि त्यानुसार क्रिया करू. ज्याच्यावर कुणीही  प्रेम करीत नसेल तशा अयोग्य व्यक्तीवर सुद्धा प्रेम करावे तेव्हाच त्याला खरं आणि निस्वार्थ प्रेम म्हटल्या जाईल अन्यथा कोणी आपल्यावर प्रेम करतं म्हणून आपण त्याच्यावर प्रेम करतो, हा व्यापार झाला फक्त स्वतःलाच महत्व न देता अन्य लोकांना महत्व दिले पाहिजे ज्यामुळे मनुष्य सुख प्राप्त करू शकतो. अन्यथा व्यक्ती जेव्हा इतरांना आपल्या अनुकूल अथवा आपल  अनुकरण करणाऱ्याच्या रूपात बघण्याची इच्छा ठेवतो तेव्हा तेथूनच संघर्ष सुरु होतो. आणि संघर्षाचा परिणाम म्हणून त्या व्यक्तीला सुखा ऐवजी दु;खाला सामोरे जावे लागते.

The post संयमाचे धनी कसे व्हाल !(भाग २) appeared first on Marathi Unlimited: Download Movies Recipes Articles Health News Actress Actors wallpapers festivals Calendar.


Viewing all articles
Browse latest Browse all 344

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>