Paneer kachori looks fluffy, crispy, yummy and mouth watering. thats looks so perfectly made kachori. really good one feel to grab the plateful. Paneer Kachori is a delicious Indian recipe served as a Snack.
साहित्य -: ४०० ग्राम मैदा, २०० ग्राम पनीर, १००ग्राम हिरवा वाटाणा, वाटीभर बारीक कोथिंबीर, ५ हिरवी मिरची, ५ लसून कळ्या, एक चमचा गोडामसाला, एक इंची आले तुकडा, दोन कांदे, तूप, मीठ
कृती -: आले, मिरची, लसून, मसाला मिक्सित काढून घट्ट पेस्ट करावी, कांदा बारीक कापुन तुपात लालसर भाजून घ्यावा, त्यात मसाला पेस्ट टाकावी व हिरवे वाटाणे मसाल्यात एकत्रित परतून घ्यावे.
पातेल्यात थोडे तूप घालून गरम करावे त्यात पनीर हलकासा भाजून घ्यावा त्यात हिरवे मटार पेष्ट मसाला परतलेले कांदे मिक्स करून चवी नुसार मीठ, कोथिंबीर घालून सारण तयार करून ठेवावा.
मैद्यात तुपाचे मोहन करून किंचित मीठ टाकून घट्ट भिजवून घ्यावा, थोडावेळ मुरु द्यावा. नंतर मैद्याच्या थोट्या दोन पुऱ्या लाटून एकीवर थोडे सारण ठेवून त्यावर दुसरी पुरी ठेवून भोवताली किनार चांगली बंद करून घ्यावी याप्रमाणे संपूर्ण कचोऱ्या बनवून नंतर तुपात तांबूस तळून घ्याव्या.
The post पनीर ची कचोरी appeared first on Marathi Unlimited: Download Movies Recipes Articles Health News Actress Actors wallpapers festivals Calendar.